MD impact – त्या 11 विद्यार्थ्यांना मिळाल्या नवीन मार्कशीट

University impact story- maharashtra desha

पुणे : एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर असून देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालात गैरहजर दाखवण्यात आले होते. महाराष्ट्र देशाने प्रथम या प्रकरणाची दखल घेत. विद्यार्थ्यांची बाजू समोर आणत हे प्रकरण उघड केले होते. आज यविद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे. विद्यापीठाने मार्कशीटमध्ये झालेली चूक सुधारुन नवीन सुधारीत मार्कशीट दिल्या आहेत.
एमआय टी कॉलेजमधील एकूण 11 विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही विद्यापीठाकडून गैरहजर दाखवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. विद्यार्थ्यांनी गेली पंधरा दिवस विद्यापीठात पायपीट केली. आता सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजनी संपर्क करून नवीन सुधारीत मार्कशीट विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच आज विद्यार्थ्यांना मार्कशीट वितरित करण्यात आल्या आहेत.
आम्ही पंधरा दिवसापासून नवीन मार्कशीट साठी प्रयत्न करतोय. मात्र विद्यापीठाने आमच्याकडे दुर्लक्ष केले होते. प्रथम ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने सदर प्रकरणाची दखल घेऊन. आमच्या मागणीला यश मिळवून दिले. आमचे एक वर्ष खाली जाण्यापासून वाचवले. त्याबद्दल महाराष्ट्र देशा चे आभार मानतो.
अक्षय पवार- विद्यार्थी, एमआयटी कॉलेज
विद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकार यापुढे होणार नाहीत. याची विद्यापीठाने हमी द्यावी. आणि परीक्षा विभागातील अधिकाऱ्यावर करवाई करण्यात यावी. प्रथम महाराष्ट्र देशाने य प्रकरणात लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. जेयूडी तर्फे महाराष्ट्र देशाचे आभार.
कुलदीप आंबेकर
जेयूडी प्रदेश सरचिटणीस

काय आहे प्रकरण वाचा या लिंक्स

Exclusive विदयार्थी परीक्षेला ‘हजर ‘ मात्र विदयापीठाच्या ‘मार्कशीट’वर गैरहजर

परीक्षा विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह ?

कुलगुरूनीं पुसली विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने