‘लोकांच्या देणग्यांचा गैरवापर करणं हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान’- प्रियांका गांधी

priyanka gandhi

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत राम मंदिर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशावेळी हा कथित गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे.

संजय सिंह यांच्या या आरोपांनंतर आता देशातील राजकारण तापू लागले आहे. आता कॉंग्रेसच्या नेत्या व काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे. कोरोडो लोकांच्या श्रद्धेचा अपमान ट्रस्टने केला असल्याचे म्हटले आहे. प्रियांका गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, कोट्यावधी लोकांनी विश्वास आणि भक्तीमुळे देवाच्या चरणी देणगी अर्पण केली आहे. त्या देणगीचा गैरवापर करणे म्हणजे अधर्म आणि पाप तसेच त्यांच्या विश्वासाचा अपमान आहे. अशा आशयाचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान समाजवादी पक्षाच्या आधीच्या सरकारचे मंत्री असलेले आणि आयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही अयोध्येत राय यांच्यावर भ्रष्टाराचे असेच आरोप केले आहेत. त्यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

IMP