‘गलती उन्हीं से होती है जो काम करते है..’अनुपम खेर यांनी घेतली माघार

अनुपम खेर

मुंबई : प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असतात. विविध मुद्यांबाबत ते सोशल मीडिया द्वारे व्यक्त होत असतात. तसेच अनुपम खेर हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ बोलताना दिसले आहेत. अनेकदा त्यांनी मोदींच्या विरोधकांवर तोफ डागलेली आहे. मात्र देशातील कोरोना परिस्थीतीवर बोलताना त्यांनी ‘केंद्र सरकारने आपल्या प्रतिमा बनवण्यापेक्षा देशातील नागरिकांच्या  जिवाला प्राधान्य दिले पाहिजे’ अस म्हणत मोदी सरकारवर टिका केली. त्यांनी केलेल्या टीकेमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. मात्र आता अनुपम खेर यांनी केलेल्या टीकेनंतर एक कविता पोस्ट करत मोदी सरकारचे समर्थन केल्याचे पाहायला मिळते.

या ट्वीट मध्ये त्यांनी लिहिले की , ‘गलती उन्हीं से होती है जो काम करते है, निकम्मों की जिंदगी तो दुसरों की बुराई खोजने में ही खत्म हो जाती है,’ त्यांच्या या ट्विटनंतर अनुपम खेर यांचा हा काय प्रकार चालू आहे याबाबत कोड पडलं आहे. मात्र स्पष्ट न बोलत त्यांनी कवितेच्या आधारे पुन्हा एकदा मोदी सरकारची बाजू घेतली असल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या या परिस्थितीत सरकारवर जी टीका होतेय ती योग्य असून, या परिस्थितीत सरकारने ते काम करावं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे’ असे अनुपम खेर म्हणाले होते. अनेकजण या टीकेमुळे गोंधळून गेले होते.

महत्वाच्या बातम्या 

IMP