‘मिशन युवा स्वास्थ’; औरंगाबादेत सोमवारपासून महाविद्यालयात होणार लसीकरण!

‘मिशन युवा स्वास्थ’; औरंगाबादेत सोमवारपासून महाविद्यालयात होणार लसीकरण!

youth

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कवच कुंडल यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. याच धर्तीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २१ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १८ वर्षांवरील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोविड- १९ लसीकरण १०० टक्के करून घेण्यासाठी मिशन युवा स्वास्थ राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

औरंगाबाद शहराच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी महाविद्यालय २० ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत. या महाविद्यालयातील १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पहिला व दुसरा डोस पूर्ण करून घेण्यासाठी २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान मिशन युवा स्वास्थ मोहीम राबवण्यात येणार आहे. या काळात मनपा आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व महाविद्यालयात लसीकरणासाठी पथक पाठवले जाणार आहे.

त्याचप्रमाणे १०० टक्के लसीकरण करून घेण्यात येणार आहे. मिशन युवा स्वास्थ्य मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढे यावे असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ८५ ते ९० महाविद्यालय असून आरोग्य विभागाने महाविद्यालयांशी संपर्क करून लसीकरण सत्राच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. ही मोहीम २५ ऑक्टोंबर पासून सुरू केली जाणार आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या