‘विक्रम’शी संपर्क जोडण्यासाठी NASAही करतय प्रयत्न, लँडरला पाठवला संदेश

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेमध्ये बऱ्याच अडचणी आल्या आहेत. चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरनं लँडर विक्रम सुस्थितीत असल्याचा फोटो पाठवला आहे. त्यानंतर आता इत्रोकडून पुन्हा संपर्क साधण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता इस्रोच्या मदतीला ‘नासा’ देखील धावून आले आहे. नासाही लँडर विक्रमला संदेश पाठवत आहे. मात्र या संदेशाला लँडर विक्रम कडून कोणताच रिस्पोनस मिळत नाहीये. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने (NASA/JPL) रेडिओ फ्रिक्वेन्सी लाँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी पाठवली आहे. डेप स्पेस नेटवर्क (DSN) च्या माध्यमातून नासा हा प्रयत्न करत आहे. स्कॉट टिले या अमेरिकन अंतराळवीरांनीही याची माहिती दिली आहे की, नासाने कॅलिफोर्नियास्थित डीएसएन स्टेशनवरून लँडर विक्रमला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली आहे.

दरम्यान इस्रोच्या मुख्यालयाशी तुटलेल्या संपर्का नंतर चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा शोध घेऊन फोटो पाठवला आहे. त्यामुळे चांद्रयान 2 मोहिम पुन्हा नव्याने सुरु होईल अशी आशा सर्वाना वाटत आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून याबाबत प्रयत्न सुरूचं आहेत. मात्र १४ दिवसाच्या आता लँडर विक्रमशी संपर्क झाला तर हे मिशन पुन्हा नव्याने सुरु होईल अशी माहिती इस्रोने दिली आहे. दिवसेंदिवस विक्रमच आयुष्य संपत आहे. आता केवळ ८ दिवस उरले असल्याने इस्रो कडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.