fbpx

Mission Chandrayaan 2 : चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार, काउंटडाऊन सुरू

श्रीहरिकोटा : भारताच्या मिशन चांद्रयान-२ मोहीमेला अवघे काही तास उरले आहेत. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. लॉन्चिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.

ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश भारत ठरणार आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हा असला तरी या मोहिमेतून भारताच्या येणाऱ्या अवकाश मोहिमांसाठी हा अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे.