‘हरवले आहेत…! नाव – अमित अनिलचंद्र शहा, पद – भारताचे गृहमंत्री’

Amit Shah

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 46 हजार 781 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 816 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 58 हजार 805 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 5 लाख 46 हजार 129 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 हजार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

अशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ऑक्सीजन, औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज देशातील परिस्थितीचा आढवा घेत असून संबधित राज्यांना सूचना करत आहेत. देशातील सर्व सरकारी यंत्रणा कोरोना विरोधात लढत आहे. मात्र या संकटाच्या काळात पाच राज्याच्या निवडणुका होताच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अमित शाह हरवले असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी बुधवारी अमित शाह हरवले असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल केली आहे. ‘कोरोना संकटाच्या काळामध्ये राजकीय नेत्यांनी देशाची सेवा करणे, लोकाच्या समस्या सोडविणे अपेक्षित आहे. अशा काळात या जबाबदारीपासून पळून जाऊ नये.’ असे या करियप्पा या तक्रारीविषयी बोलताना म्हणाले आहेत.

तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी नागेश करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी NSUI च्या कार्यालयात आले होते. असा दावा NSUI चे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चुघ यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘२०१३ पर्यंत राजकारणी नागरिकांप्रती जबाबदार होते. पण त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर हे चित्र पुर्णपणे बदलले. आता पंतप्रधानानंतर सर्वात महत्वाची व्यक्ती असलेले गृहमंत्री कोरोना महामारीच्या काळात हरवले आहेत. ‘

महत्वाच्या बातम्या 

IMP