सोनिया गांधी बेपत्ता 

रायबरेलीत सोनिया गांधी हरवल्याचे पोस्टर्स

वेब टीम:- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हरवल्या असल्याचे पोस्टर्स सध्या त्यांच्या  रायबरेली मतदारसंघात लावण्यात आले आहे. या आधी असाच प्रकार कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाबतीत घडला होता.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघात राहुल गांधी हरविल्‍याचे पोस्‍टर पहायला मिळाले होते . सोनिया गांधी या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासुन परत मतदार संघात फिरकल्याच नाहीत. मतदार संघातील कामाचा आढावा देखील घेतला नाही त्यामुळेच कदाचित त्या हरवल्या आहेत अश्या प्रकारचे फलक झळकताना पहायला मिळत आहेत.

sonia GANDHI MISSING POSTERS
सोनिया गांधींचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. तसेच हे पोस्टर रायबरेलीमधील नागरिकांच्या वतीने लावण्यात आल्याचेही या पोस्‍टरमध्ये म्हणले आहे.पोस्टर्सच्या माध्यमातून राजकीय वार करण्याची पुण्यातील राजकारणाची पद्धत आता व्यापक बनत चालली हे मात्र निश्चित .

You might also like
Comments
Loading...