नेम चुकला : पत्नी दिपीकानंतर पती अतनु दास ऑलिम्पिकमधून बाहेर

नेम चुकला : पत्नी दिपीकानंतर पती अतनु दास ऑलिम्पिकमधून बाहेर

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय तिरंदाजीचे आव्हान शनिवारी ३१ जुलै रोजी संपुष्टात आले आहे. सर्व तिंरदाज पराभूत झाल्यानंतर भारताच्या आशा दिपीका कुमारी आणि अतनु दास या जोडीवर सर्व आशा होत्या. मात्र पत्नी दिपीका पराभूत झाल्यानंतर पती अतनु दासला शनिवरी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

भारताचा तिंरदाज अतनू दासचा यजमान जपानच्या ताकाहारू फुरूकावाने ४-६ असा पराभव केला. अतनु दासला पराभूत करताच जपानच्या तिरंदाजाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ताकाहारुने फुरुकावाने पुरुष एकेरीमध्ये यापूर्वीच पदक जिंकले आहे. या सामन्यात पहिला सेट फुरूकावानं २७-२५ असा जिंकला. यानंतर दुसरा सेट २८-२८ असा बरोबरीत संपला. त्यानंतर अतनू दासने पुनरागमन करत तिसऱ्या सेटमध्ये २८-२७ असा विजय मिळवला.

यानंतर पुढील चौथ्या सेटमध्ये पुन्हा दोन्ही खेळाडूंनी एकदा जोरदार संघर्ष केल्याने हा सेट २८-२८ असा बरोबरीत सुटला. यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेट मध्ये जपानी तिरंदाजाने २७-२६ अशी बाजी मारली आणि सामन्यात विजय मिळवला. यापुर्वी शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिपीका कुमारीला दक्षिण कोरियाच्या तिरंदाजाने  पराभूत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या