दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; उदयनराजें सोबतच्या भेटीनंतर संभाजीराजे कडाडले

sambhajiraje vs udayanraje

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाजच्या मागण्यांवर विचार नाही झाला तर पुण्यातून मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा थेट इशारा देखील खा. संभाजीराजे यांनी दिला आहे.

यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं.

या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संभाजीराजे म्हणाले, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. दोन्ही घराण्यांमध्ये कोणतंही दुमत नाही. या भेटीने आनंद झाला. मराठा समाजासाठी आम्ही एकमतानेच काम करतोय. आता मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पेटिशन ची गरज नाही, असा अहवाल भोसले समितीने दिला आहे. राष्ट्रपतींच्या मार्फत ३३८ ब च्या अंतर्गत मागास आयोगाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिफारस केली जावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

पुढे १६ तारखेच आंदोलन होणार असून राज्य सरकारने मराठा समाजाच्या ६ मागण्या मान्य कराव्यात. सुपरन्यूमररी पद्धत वापरावी, याआधी देखील या पद्धतीचा राज्यात वापर केला गेला आहे असं देखील संभाजीराजे म्हणाले.

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या ?

१) ९ सप्टेंबर 2020 च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्ती देऊन टाका.

२) शाहू महाराजांच्या नावाने उभं केलेल्या सारथीसाठी कमीत कमी १ हजार कोटी द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले जागा दिलीये, पण नुसतं जागा देऊन काय होणारे ? तिथं चांगली लोकं द्या…नाही तर रद्द करून टाका, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

३) अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुन्हा उभारणी करा.

४) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करा, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ते तरी करा

५) ७० टक्के गरीब मराठा समाजाची चुक काय ? मराठा समाज देखील बहुजनांचा घटक त्यांनाही सवलती द्या !

६) सुपरन्यूमररी पद्धतीने मराठा समाजाला शिक्षणासह इतर सवलती लागू कराव्यात.

महत्वाच्या बातम्या 

IMP