पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बिर्याणी खायला तरसणार

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या पराभवाच्या कारणांपैकी क्रिकेटर्सचा फिटनेस हे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे समोर आले होते. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कायापालट करण्याचा विडा आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यानं उचलला आहे.

मिसबाह उल हक यानं खेळाडूंसाठी नव्याने डाएट प्लान तयार केला आहे. आहारात खेळाडूंना बिर्याणी, तेलकट-तिखट पदार्थ आणि मिठाई मिळणार नाही.नव्या डाएट प्लाननुसार स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि राष्ट्रीय शिबिरांमध्ये खेळाडूंना तेलकट-तिखट पदार्थ मिळणार नाहीत. तसंच राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना तंदुरुस्तीवर भर द्यावा लागेल, अशी ताकीद मिसबाहनं दिल्याचं समजतं.

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाडूंच्या डाएट प्लानवर संताप व्यक्त केला होता. पाकिस्तानचे खेळाडू पिझ्झा आणि बर्गर खाऊन जाड झाले आहेत, असे खेळाडू भारताचा काय पराभव करणार? असे सवाल या प्रेक्षकांनी उपस्थित केले होते.

महत्वाच्या बातम्या