‘राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या गैरव्यवहार ; 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी’

ra,m mandir

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत राम मंदिर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशावेळी हा कथित गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि प्रवर्तन निदेशनालयाने करण्याची मागणी केली आहे. इतक्या कमी वेळात या जमिनीची किंमत इतकी जास्त कशी काय वाढू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही याच प्रकारचा आरोप केला आहे.

संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने करोड रुपयांची जमीन १८ करोडमध्ये खरेदी केली असल्याचा दावा संजय सिंह यांनी केली आहे. हे आर्थिक देवाण-घेवाण प्रकरण असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीच्या मार्फत चकशी व्हावी अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP