मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व घडामोडीवर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर मिर्झापूर (Mirzapur) फेम अभिनेता दिव्येंदु शर्मानं देखील महाराष्ट्रील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. त्याने कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला आहे.
दिव्येंदु शर्मानं (Divyendu Sharma) त्याच्या ट्विटवरवरून ट्विट करत लिहिले की, “सेल…सेल…सेल…एमएलए ले लो… या कथित नेत्यांसाठी राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे”. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. १५ हजार पेक्षा जास्त लोकांनी हे ट्वीट लाइक केलं आहे तर २ हजार पेक्षाही जास्त लोकांनी ते रिट्विट केलं आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
SALE… SALE…SALE….
MLA lelooooooo
Politics is only a PROFESSION for these so called ‘leaders’
— divyenndu (@divyenndu) June 22, 2022
या ट्विटवर अनेक सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘अगदीच बरोबर आहे सर, मी याच्याशी सहमत आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘सत्य हे कंटाळेल पण कधीच हार मानणार नाही.’ त्याचबरोबर अजून एका युजरने लिहिले, ‘जनता टॅक्स देत राहिली आणि नेता मजा करत राहिले.’ अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :