एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण करणारी ३५२ जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

army

अहमदनगर : भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात प्रवेश करण्यासाठी तयार झालेल्या जवानांच्या ४०७ व्या तुकडीतील ३५२ सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली.भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड फोर्सेसचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल ए.बी.शिवाने यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले.यावेळी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणा-या सैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.अहमदनगरमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसी तील अखौरा ड्रील मैदानावर आयोजित दिक्षांत समारंभात प्रशिक्षण पूर्ण करणा-या ४०६ व्या तुकडीतील ८६ जवानांनी शानदार परेड करून भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड फोर्सेसचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल ए.बी.शिवाने यांना मानवंदना दिली.एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही.व्ही. सुब्रमण्यम,डेप्युटी कमांडंट कर्नल यू.एम.विशाल सहीत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व रिक्रुट जवानांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्करी प्रथेनुसार विविध धर्म गुरूंनी परेड मैदानात आणलेल्या भगवत गीता, गुरूग्रंथ साहिब,कुराण शरीफ,बायबल सारख्या आपापल्या पवित्र धर्मग्रंथांवर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली.परेड अॅडज्युटंट मेजर क्षितीज सेन यांनी या रिक्रुट जवानांना देशाचे संविधान व देश संरक्षणासाठी इमानदारी,निष्ठा व कठीण स्थितीत आपली जबाबदारी पूर्ण करण्याची शपथ दिली.भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड फोर्सेसचे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल ए.बी.शिवाने यांच्या हस्ते ४०7 व्या तुकडीतील सर्वोत्कृष्ट रिक्रुट साठीचे जनरल सुंदरजी सुवर्ण पदक रिक्रुट यशवंत मोकाटे याला,जनरल डिसुजा रजत पदक रिक्रुट रिंकु चौधरी याला व रिक्रुट योगेश याला जनरल पंकज जोशी कांस्य पदक देऊन गौैरविण्यात आले.दिक्षांत संचलनाचे निरीक्षण केल्यानंतर बोलतांना भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड फोर्सेस चे डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल ए.बी.शिवाने यांनी प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवा सैनिकांना शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले,कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे प्रशिक्षण सफलता पूर्वक पूर्ण करणारे हे कुशल सैनिक आता ख-या अर्थाने आपल्या सैनिक जीवनाची सुरूवात करीत आहेत.प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक आव्हाने व कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे युवा फौजी देशाची आन,बान आणि शान यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही तयार आहेत.दिक्षांत परेड नंतर आयोजित शानदार समारंभात प्रशिक्षण पूर्ण करून सेनेत दाखल होणार्या या युवा सैनिकांच्या माता-पित्यांना लेफ्टनंट जनरल ए.बी.शिवाने यांच्या हस्ते विशेष गौरव पदक प्रदान करून गौैरविण्यात आले.खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शपथग्रहण करणा-या या सर्व तरुण सैनिकांना आपल्या युनिटमध्ये जाण्यापूर्वी अॅडव्हान्स तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.