fbpx

वर्ल्ड वेटलिफ्टिंग: भारताच्या मिराबाई चानूला सुवर्णपदक

Mirabai chanu

टीम महाराष्ट्र देशा – भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे.अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित स्पर्धेत चानूने ४८ किलो वजनी गटात तिने सुरुवातीला स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलले. त्यानंतर जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलत तिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले.

अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णकामगिरी केली होती.यापूर्वी कर्णम मलेश्वरीनं १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. देशासाठी सुवर्ण कामगिरी केल्यानंतर चानूला अश्रू अनावर झाले. या स्पर्धेत थायलंडची सुकचारोनला रौप्य तर सेगुरा अना हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चानूला अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा एकदा आपल्यातील कसब दाखवून दिले.

3 Comments

Click here to post a comment