fbpx

‘काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री होणे हे केवळ स्वप्नच राहील’

नाशिक : राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री होणे हे केवळ स्वप्नच राहील, आणि आघाडीचे ५० आमदारही निवडून येणार नाहीत, असा दावा जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नाशिक इथं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते.

ऑक्टोबर महिन्यात १२ किंवा १३ तारखेला विधानसभा निवडणुका होतील, त्याआधी आघाडीचे अनेक आमदार भाजपात येतील असं ते म्हणाले. कालच्या बैठकीत नाशिकसाठी ७९१ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला आहे, मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली असून पाऊस समाधानकारक झाला तर शहरातली पाणी कपात आठ दिवसात रद्द केली जाईल, असं ते म्हणाले.