धक्कादायक : बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये बलात्कार !

टीम महाराष्ट्र देशा : १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहामध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बारामतीमधील एका माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि.२८ ) सकाळी ११ च्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती येथील एका माध्यमिक विद्यालयातील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहामध्ये बलात्कार केला. याप्रकरणी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्कारात त्या मुलाला आणखी एकाने मदत केल्याचे पिडीतेने म्हटले आहे. एवढेच नाही तर ती मुलं पिडीतेच्या ओळखीचे असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी शाळेतील दोघा आरोपी विद्यार्थ्यांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबांधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.