शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गावकऱ्यांनी दिली तिसगाव बंद ची हाक

पाथर्डी – शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्ड़ी तालुक्यातील तिसगाव मधील मांड़वे या गावात घडली आहे .

इयत्ता पाचवीमध्ये  शिकणारी मुलगी शाळेत जाताना अज्ञात इसमाने ‘ मी तुला शाळेत सोड़तो ‘ असे सांगुन तिला नेले.त्यानुसार तीच्यावर अत्याचार केला. ती मुलगी अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार घेत आहे.या घटनेमुळे गावात संतापाच वातावरण आहे. या घटनेमुळे गावातील वातावरण फार संवेदनशील झाले आहे.या घटनेमुळे  झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तिसगाव बंद करण्यात आले होते.गावातील शाळकरी मुलींनी अत्याचारीत मुलीला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तसेच ही घटना घड़ल्याच्या तीन तासापासून तिसगाव मधे रास्ता रोको आणि अंदोलन देखील झाले .

दरम्यान पोलीस तब्बल तीन तास उशिरा आल्याने अंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना संतप्त करून उग्र स्वरूप धारण केले.’ पोलीस ड़िपार्टमेंटचा धिक्कार असो ‘ अशा घोषणा दिल्या . आरोपी शोधुन काढण्यासाठी अंदोलनकर्त्यांनी एक दिवस पोलीस प्रशासनास दीला आहे,अन्यथा उग्र स्वरूपाचे अंदोलन करू असे आवाहन करण्यात आले.

 

You might also like
Comments
Loading...