पुण्यात चिमुरडीवर ६ जणांनी केला गँगरेप; ६ मधील ५ अल्पवयीन

Gang-rape

पुणे: पुण्यामध्ये पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीवर ६ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कोंढव्यातील मिठानगर भागामध्ये राहणाऱ्या चिमुरडीवर गेली पाच महिने हा लैंगिक अत्याचार सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय मुलाला अटक केलीय, तर अन्य ५ जन अल्पवयीन आहेत. दरम्यान या घटनेन एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी आणि आरोप मुले एकाच भागात राहतात. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. आरोपींमध्ये ६ वर्षाचा एक. १२ , ९ वर्षाचे दोन. दोघे १० वर्षांची तर एक मुलगा 18 वर्षांचा आहे. चुमिकलीला त्रास होवू लागल्याने दवाखान्यात घेवून गेल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी रात्री उशिरा संबंधित मुलांना ताब्यात घेण्यात आल असून निरीक्षणगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.