‘पर्रीकर रिटर्न्स’?; निवासस्थानी होणार मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी कल्पना कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना दिली आहे. पर्रीकर यांची प्रकृती आता पूर्वीच्या तुलनेत सुधारली असल्याने पर्रीकर पुन्हा सक्रिय होणार अशी चिन्हे निर्माण झाली आहे.

मंत्री सरदेसाई हे दुबईच्या दौ-यावर गेले आहेत. निघण्यापूर्वी त्यांनी गुरुवारी करंजाळे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पर्रीकर यांची भेट घेतली. आपण सोमवारी घरी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ इच्छितो, असे पर्रीकर यांनी सरदेसाई यांना सांगितले. सरदेसाई यांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपण दुबईला जात असल्याने कदाचित सोमवारी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, पण तुम्ही मंत्रिमंडळ बैठक घ्या, असे सरदेसाई यांनीही पर्रीकर यांना सुचविले.

मोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी

You might also like
Comments
Loading...