तुमच्या मोबाईलमधील हे चार अॅप्स तात्काळ करा डिलीट अन्यथा…

मोबाईल अॅप्स

मुंबई – तुम्ही स्मार्टफोन वापरत आहात आणि त्यामध्ये विविध अॅप आहेत तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्या मोबाईल फोन्समध्ये असलेले चार अॅप्समुळे तुम्ही  अडचणीत येऊ शकता, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेले हे चारही अॅप डिलीट करा. पाहूयात काय आहे हा संपुर्ण प्रकार…

पाकिस्तानकडून मोबाईल अॅपच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचे भारतीय गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी एजन्सी भारतात मोबाईल अॅपमध्ये मालवेअर व्हायरस पाठवून हेरगिरी करत आहे. यामुळे मोबाईलमधील हे चार अॅप्स डिलीट करण्याचे आवाहन गृह मंत्रालयाकडून करण्यात आले आहे

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या अॅप्समध्ये व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवत आहेत. त्यामुळे, टॉप गन (गेम अॅप), एमपीजंक (म्युझिक अॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एन्टरटेन्मेंट अॅप) हे चार अॅप्स युझर्सने तात्काळ आपल्या स्मार्टफोनमधून डिलीट करावेत, असे आवाहन गृह खात्याकडून करण्यात आले आहे.