उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यांची मंत्रिपदं जाणार ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकींमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉंग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळाली नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेतलं जाईल असा कडक शब्दात इशारा देण्यात आला आहे.

पंजाब मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस नेत्यांना मोठं आव्हान असणार आहे त्यावर भविष्यातील त्यांचे मंत्रीपद पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे की, आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. जर मतदान कमी झालं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे काँग्रेस आमदारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.Loading…
Loading...