दानवे राहुल गांधींना ‘सांड’ म्हणाले, यशोमती ठाकुरांनी घेतले फैलावर…

yashomati thakur - ravsaheb danave

अकोला : भाजपच्या जनआर्शिवाद यात्रेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सांड’ म्हटले होते. यावरुन भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यावरून आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रावसाहेब दानवे यांना चांगलेच सुनावले आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेली टीका हा तर राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्याचा खटाटोप असल्याची घणाघाती टीका ठाकूर यांनी केली आहे.

दरम्यान, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काडीचेही योगदान नाही. तरी देखील देशासाठी आहुती देणाऱ्या गांधी घराण्याला बदनाम करण्यासाठी भाजपचे नेते ठरवून असले आरोप करत असतात. आम्ही देखील रावसाहेब दानवे यांना ‘म्हसोबाला सोडलेला बोकडा’ असल्याचे म्हणू शकतो. मात्र, ती आमची संस्कृती नाही. त्यामुळे आम्ही असे म्हणणार नाही.’ असा घणाघात काँग्रेसच्या वतीने सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या