शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याने आमचं टेन्शन गेलं – विष्णू सावरा

टीम महाराष्ट्र देशा: “शिवसेना सत्तेत राहून विरोधकांचे काम करत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी अर्ज भरायचं काम सुरु असताना युती तुटली होती. यावेळी मात्र शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याने एका दृष्टीनं टेन्शन गेलं.” असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे. यशवंतराव भांगरे आदिवासी सामाजिक प्रतिष्ठान आयोजित आदिवासी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे यशवंतराव भांगरे आदिवासी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज आयोजित आदिवासी शेतकरी मेळ्यावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विष्णू सावरा यांच्या हस्ते भांगरे स्मृती पुरस्कार देण्यात आले.