गिरीष बापटांची चरबी आणि माज उतरवणार: राज्यमंत्री विजय शिवतारे

पुणे: पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभाला न बोलावल्याने जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘गिरीष बापटांची चरबी आणि माज उतरवणार’ अशा शब्दात शिवतारे यांनी गिरीष बापटांवर तोंडसुख घेतलं.पुण्यातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना भूमिपूजन सोहळ्याला न बोलवल्यानं त्यांनी भाजपच्या गिरीष बापटांवर जोरदार टीका केली आहे.

‘माझ्या विधानसभा मतदारसंघात पुणे महापालिकेचे तीन प्रभाग येतात. त्यामुळे प्रोटोकोलनुसार मला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच आमंत्रण असायला हव होतं. परंतु बापटांनी मुद्दामहून मला या कार्यक्रमपासुन दूर ठेवलं. बापट अकार्यक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काही संबंध नाही. बापट मुख्यमंत्यांची दिशाभूल करतायत. याबात मी मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे.’

 

‘भाजपला शिवसेनेसोबत पिंपरी-चिंचवडला युती हवी आहे पण पुण्यात नको. ही भाजपची दुहेरी नीती आहे. यामाग बापटांचं घाणेरडं राजकारण आहे. पुणे महापालिका सर्व जाहिरातींमधे प्रोटोकोलनुसार माझं नाव छापते. मग बापटांना अडचण काय? बापटांनी हे जाणीवपुर्वक केलं आहे. त्यांची चरबी आणि मस्ती आम्ही उतरवणार.’ अशी टीका शिवतारे यांनी केली.