चांदा ते बांदा योजनेतील कामांना वेग द्या- सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar

टीम महाराष्ट्र देशा : चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम “चांदा ते बांदा” या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामांना वेग द्या आणि ही काम उत्तमरित्या पूर्ण करतांना त्याचा दर्जा ही उत्तम राहील याची काळजी घ्या अशा सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव आर.ए.राजीव, चंद्रपूर चे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सिंधुदूर्ग चे जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चांदा ते बांदा योजनतील पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर या पॅटर्नप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यांचाही एकात्मिक आणि सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगून श्री. मुनंगटीवार म्हणाले की, या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. योजनतील कामांचे प्रशासकीय मंजूरीचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना आहेत परंतू त्यांच्या तांत्रिक मंजूरीचे प्रस्ताव हे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी नियोजन विभागात थेट सादर करावेत. त्या प्रस्तावांना संबंधित विभागाकडून तांत्रिक मंजूरी मिळवून देण्याची प्रक्रिया नियोजन विभागामार्फत समन्वयाने पूर्णत्वाला नेली जाईल, यामुळे प्रस्तावाच्या तांत्रिक मंजूरीसाठी लागणारा वेळ कमी लागेल असेही ते म्हणाले.

Loading...

 

1 Comment

Click here to post a comment