सुभाष देशमुख पुन्हा वादात; आरक्षित जागेवर बांधला आलिशान बंगला

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी अग्निशमन दलासाठी आरक्षित जागेवर बंगला बांधल्याचा आरोप करण्यातआला आहे. या आरोपांमुळे देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.

सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाच्या बेकायदा बांधकाम विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात महानगरपालिका आयुक्तांनी सुभाष देशमुखांना सुनावणीसाठी 17 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आरक्षित जागेवर नियमबाह्य आणि बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका सुभाष देशमुखांवर ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुभाष देशमुखांनी आलिशान बंगला बांधल्याचं समोर आलं.