तर मंत्रीपदाचा राजीनामा देणार; शिवसेनेच्या सुभाष देसाईंचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेचा विरोध डावलून कोकणातील नाणार ऑईल रिफायनरीच्या सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थितीत होते. दरम्यान. आता आपल्यालाही माध्यमांमधूनच करार झाल्याच समजलं असल्याच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे. तसेच प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास आपण राजीनामा देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

कोकणातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ऑईल रिफायनरीला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. राज्य आणि केंद्राच्या सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेनेकडून स्थानिक नागरिकांच्या मागणीला पाठींबा देण्यात आला असून विरोधाची धार तीव्र करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये काल नवी दिल्ली येथे सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये करार करण्यात आला आहे.

करारबाबतची आपल्याला कोणतीही पूर्व कल्पना नसल्याच सुभाष देसाई यांनी सांगितले आहे, तसेच केंद्रात शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री अनंत गीते यांना देखील याची माहिती देण्यात आली नसल्याच त्यांनी देसाई यांनी सांगितले .

You might also like
Comments
Loading...