सुभाष देसाईंचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी मात्र राजीनामा फेटाळला

मुंबई : उद्योग मंत्री सुभाष देसाईं यांच्या खात्यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप विरोधकाकडून करण्यात येत आहे. यावरून विधीमंडळात विरोधकांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठा गदारोळ केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा दिला आहे.

सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे . मात्र मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा फेटाळला आहे . एमआयडीसीची ४०० एकर जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

 

You might also like
Comments
Loading...