शेतकरी दुष्काळाच्या उन्हात, मंत्री सदाभाऊ खोत एसीच्या गार वाऱ्यात

टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे नागरिक हैराण झालें आहेत, जनावरांना चारा पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हात वणवण करावी लागत आहे. सरकारमधील अनेक मंत्री दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यामध्ये स्वतःला शेतकरी नेते म्हणवणारे पशुसंवर्धन मंत्री सदाभाऊ खोत हे औरंगाबाद येथे दुष्काळ दौऱ्यावर असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिल्याने टीका होत आहे.

सदाभाऊ खोत हे औरंगाबाद येथे दुष्काळ दौऱ्यावर आहेत, दौऱ्यावर असताना त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम केल्याचं समोर आलं आहे. एका बाजूला शेतकरी दुष्काळाच्या उन्हात तळपत असताना शेतकरी नेते म्हणवणारे सदाभाऊ खोत मात्र एसीच्या गार वाऱ्यात राहत असल्याची टीका केली जात आहे. सदाभाऊ खोत यांनी मात्र आचारसंहिता असल्याने शासकीय विश्राम गृहात जाता येत नसल्याने, आपण केवळ आंघोळ करायला हॉटेलमध्ये गेल्याचं सांगितल आहे.

Loading...

दरम्यान, महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राज्यकर्ते निवडणुकीत गुंतले आहेत, टीका सुरु झाल्यानंतर मंत्री दुष्काळ दौरा करतायत, स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवणारे मंत्री जर पंचतारांकित संस्कृतीतून बाहेर पडणार नसतील, तर शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा राजू शेट्टी यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही