fbpx

आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही – रामदास कदम

टीम महाराष्ट्र देशा : ज्या बँका, कंपन्या ऐकत नाही त्यांना वठणीवर आणू, आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही. असे वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते जालन्यात दुष्काळ दौऱ्यावर होते.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते, सोबतच पर्यावरण मंत्री रामदास कदमही होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

त्यावेळी आम्ही काय मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही. ज्या बँका, कंपन्या ऐकत नाही त्यांना वठणीवर आणू, असे कदम यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांना सध्या पिक विम्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने पीक विमा मदत केंद्राची स्थापना केली आहे, असेही त्यांनी म्हंटले.