माझ्यासोबत राहणारे सर्वच मोठे होतात, मुरलीधर मोहोळही आमदार होतील – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : राजकीयदृष्ट्या मुरलीधर मोहोळ मोठे झाले आहेत, मोहोळ आता आमदारही होतील, असे वक्तव्य केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कोथरूड येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading...

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातून मुरलीधर मोहोळ हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. अनेक वर्षांपासून ते मतदार संघात काम करत आहेत. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यासाठी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांना आमंत्रित केले होते. आठवले यांनी मोहोळ यांच्या मतदार संघातील विकासकामांचे उदघाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधले. त्यावेळी राजकीयदृष्ट्या मोहोळ मोठे झाले आहेत. पण आता माझ्यासोबत असल्याने ते आणखी मोठे होतील. माझ्यासोबत राहणारे सर्वच मोठे होतात, मुरलीधर मोहोळही मोठे झालेत आता ते देखील आमदार होतील, असे वक्तव्य आठवले यांनी केले.

विशेष म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कोथरूड मतदार संघातून भाजपच्या मेधा कुलकर्णी सध्या विद्यमान आमदार आहेत, याचदरम्यान रामदास आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यावरून मोहोळ आणि कुलकर्णी यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवले जात आहे.Loading…


Loading…

Loading...