अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : होनमुर्गी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील शेतकरी रस्त्यावर जखमी पडला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांना भाज्या घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाल्याचे निदर्शनास येताच क्षणात कसलाही विचार न करता गाडी बाजूला घेतली अपघातग्रस्त शेतकऱ्याला विव्हळत पडलेला पाहून मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वतःची गाडी देऊन जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. फोनवर सिव्हिल मध्ये डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घातले.

ट्रक्सच्या धडकेने जखमी झालेल्या शेतकऱ्याला रस्त्याच्या कडेला रक्ताने लटपटत पडलेला पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परता दाखवून त्याला मदतीचा हात दिला. मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वतः देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकऱ्यांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले.