राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीमाभागातील बेळगावमध्ये  संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम १७ जानेवारीला आयोजित केला जातो.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आज शुक्रवारी बेळगावला पोहोचले होते. परंतु, हुतात्मा चौक येथील कार्यक्रमात यड्रावकरांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले.

Loading...

यावेळी यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. यड्रावकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी कुणाचंही ऐकून घेतलं नाही आणि थेट यड्रावकर यांना ताब्यात घेतलं.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा परिचय-

राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्यसरकारमध्ये राज्यमंत्री असून त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यमंत्री ही खाती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे आहेत. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण