राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी मंत्रालयाबाहेरील अंधारातच भरवला जनता दरबार!

ahamad ngar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना ‘जनता दरबार’ हा उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात मंत्री जनतेच्या समस्या ऐकून त्या समस्या सोडवण्यावर भर देतात.

मात्र नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्रिमंडळ बैठक संपण्यास उशीर झाल्याने मंत्रालयाबाहेर अंधारातच लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे ना.तनपुरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

ना.प्राजक्त तनपुरे यांचा दोन दिवसांपूर्वी दुपारी चार ते सहा या वेळेत जनता दरबार होता. मात्र त्यादिवशी संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे तनपुरे यांना नियोजित जनता दरबारात पोहोचता आले नाही. त्यामुळे आपल्याला उशीर झाल्यामुळे लोकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आपले मंत्रालयीन कामकाज संपताच मंत्रालयाबाहेरील परिसरात, भर अंधारात लोकांची भेट घेतली. जनतेला माघारी पाठवण्याऐवजी त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर अंधारातच आलेल्या लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्वीपासून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आली आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक झाली की मनाला समाधान मिळते. शेवटी ते आहेत म्हणून आपण आहोत. अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-