नोकरी लावण्याचे आश्वासन मोदींनी दिलेच नव्हते- केंद्रीय मंत्री

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल भाजपचे वाचाळ मंत्री आपल्याच पक्षाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता असच एक वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केलं आहे. ते म्हणतात नरेंद्र मोदींनी किंवा भाजपनं 2014 च्या निवडणुकीमध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासनच दिलं नव्हतं. मग आता खुद्द नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात तरुणांना दरवर्षी तरुणांना 1 कोटी नोक-या देण्याचं आश्वासन दिलं होतं. तो एक निवडणूक जुमला होता का असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवप्रताप शुक्ला यांनी नवभारत टाईम्स या हिंदी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे. त्यामुध्ये त्यांनी मोदींना 2014 मध्ये तरुणांना नोक-या देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. तर तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं असं वक्तव्य शिवप्रताप शुक्ल यांनी केलं आहे. महागाई आणि विकास दर घसरल्यामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. त्यावरही त्यांनी या दोन्ही समस्या या जागतिक समस्या आहेत. या केवळ भारताच्या समस्या नाहीत असं सांगून टाकलं.