माझ्याकडे आमच्या नात्याचे पुरावे

sadabhau-khot-

सांगली: आधीच चर्चेचा विषय असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आता एका मागसवर्गीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. लग्नाचे आणि मुलांना सांभाळण्याचे आमिष दाखवून सदाभाऊ यांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

दरम्यान काल याच विषयावर विधानसभेतही वादळी चर्चा करण्यात आली आहे. यानंतर आता या प्रकरणी पीडितेने एका व्हिडीओच्या मार्फत आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे दाबाव टाकला जात असल्याच सांगितल आहे.

‘२०१३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून सदाभाऊ यांच्याशी मैत्री झाली. त्यानंतर २०१५ या कालावधीपर्यंत असहाय्यतेचा फायदा घेऊन जवळीक साधत सदाभाऊ खोत यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपल्याशी भेटणे टाळू लागले. यानंतर फोन घेणे टाळू लागले यानंतर मंत्री झाल्यावर सदाभाऊ खोत यांनी आपल्या संबंधीची वाच्यता करू नये अशी धमकी देण्यास सुरुवात केल्याच संबंधित महिलेन सांगितले आहे.

या व्हिडिओच्या आधी पिडीत महिलेन एक पत्रक लिहून आपल्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांत तक्रार केली होती.मात्र, दुसऱ्याच दिवशी हि तक्रार मागे घेण्यात आल्याच सांगण्यात आल. मात्र आता आपणही कोणतीही तक्रार मागे घेतली नसून सदाभाऊ आणि आपल्या नात्याबद्दल आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा हि या महिलेन केला आहे.