विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडूंचा पुढकार

बच्चू कडू

औरंगाबाद : विद्यापीठाचा यशस्वीपणे चालवताना या कंत्राटी कामगारांची मोलाची मदत होती. त्यांच्या मदतीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पत्र दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५० कमत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या १५ ते २० वर्षापासून इमाने-इतबरी अरनले काम चोख बजावत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५० कंत्राटी विद्यापीठ प्रशासन कंत्राटी कामगारांना कायम करायला तयार नाही. एवढेच नव्हे तर कायम स्वरुपी कर्मचा-याप्रमाणे काम करुन देखील समान काम समान वेतन न देता तुटपुंज्या कामगारांचे शोषण करत आहेत. वारंवार प्रशासनाकडे मागणी करुन देखील समान काम समान वेतन द्यायला प्रशासन तयार नाही. कर्मचाऱ्यांनी राज्याचे कामगार राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु भाऊ कडू यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यांची व्यथा मांडली.

कंत्राटी कामगारांची यांची दखल घेऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करुन त्यांनी समान काम समान वेतन व कायम करण्यासाठीचे पत्राद्वारे कळविले आहे. ज्यापर्यंत या कर्मचा-यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत याचा पाठपुरावा करु असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्मचा-यांना शब्द दिलेला आहे. समान काम समान वेतन या न्यायानूसार एकच काम करणा-या कर्मचा-याला तुटपूंज्या वेतनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषन थांबविण्याबाबत निवदेनात मागणी केली आहे. यासाठी विद्यापीठ कर्मचा-या सोबत प्रदिप त्रिभुवन महानगरप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांनी प्रयत्न केले.

महत्वाच्या बातम्या

IMP