दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना कारभार सांभाळता येत नाही- अजित पवार

पुणे: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पिंजून काढले. दरम्यान, दौंड येथील सभेत बोलत असतांना अजित पवार यांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर टीका केली.

अजित पवार म्हणाले, गुरांना होणाऱ्या लाळ्या-खुरकत या रोगाची लस सरकारनी थांबवून ठेवली होती. आम्ही तो मुद्दा सभागृहात लावून धरला. दुग्धविकास मंत्री असलेल्या महादेव जानकर यांना कारभार सांभाळता येत नाही. अशी कणखर टीका अजितदादांनी केली.

सरकार शंभर दिवसात यशवंत साखर कारखाना सुरू करणार होते, पण तसे झाले नाही. तीच परिस्थिती अन्य साखर कारखान्यांची आहे. संस्था उभी करायला अक्कल लागते, मोडीत काढायला नाही, असे बोलत दादांनी भाजपवर सुद्धा टीकास्त्र सोडले.