बकरी ईद बाबत मंत्री नवाब मलिक यांचा खुलासा

Nawab Malik

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावरून निर्माण झालेल्या प्रश्नांवर राज्यमंत्री नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणतात,  गृहमंत्र्यांनी जी गाईडलाईन केलीय त्यात कोणतेही निर्बंध नसून लॉकडाऊन असताना बोकड कापायला कोणतीही बंदी नव्हती आताही बंदी नाही असे ते म्हणाले. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतूकीची अडचण नाही.

कुर्बानी ने कोरोना जाणार का ? दरेकरांचा शरद पवारांना सवाल

तसेच, ज्यांनी बकरी आँनलाईन नोंद केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल. एकदा आँनलाईन बकरी बूक केली तर वाहतुकीशिवाय शिवाय त्यांची बकरी येवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे हे सर्व विषय ठेवण्यात आल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.तर, बकरी ईद बाबत जे नियम आहेत ते तसेच आहेत.नियमानुसार बकरी ईद साजरी करता येईल. या संदर्भात कोणतीही अडचण नाही असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. यासंदर्भात झी २४ तास ने वृत्त दिले आहे.

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यांची भूमिपूजन आणि उद्घाटन थांबवावे, आम्ही राम मंदिराचे भूमिपूजन थांबवू’: सुजय विखेंचा अजब तर्क

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी ईदसाठी मशीद उघडणे आणि प्राण्यांची कुर्बानी देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता औरंगाबाद महापालिका हद्दीत सूट मिळणार नसल्याचं मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली होती.

पुरातन वास्तूंच्या जतन व संरक्षणासाठी १५ व्या वित्त आयोगातून आर्थिक सहाय्य द्या

या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.