नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई होणार का ?

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या भीतीने लोक घरात बसून आहेत. अनेक मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासह सामान्य नागरिकही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन सर्वजण युध्दपातळीवर कर्तव्य बजावत आहेत.

संकटाच्या या काळात अनेक सेलिब्रिटी मदतीचा हात पुढे करत आहेत, अक्षय कुमार सारखा अभिनेता देशासाठी जनतेच्या मदतीला धावला. एक दोन नव्हे तर २५ कोटी रूपये पंतप्रधान निधीला देण्याची घोषणा केली आहे. मात्र अजूनही असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळालेले नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेलिब्रिटीवर कारवाई होणार का, असा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ”कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरात कोंडून घेतले असताना गाडी चालवत आणि तोंड दाखवत तर कधी मास्कने नाक झाकत बिनधास्तपणे हा सेलिब्रेटी कुठे निघाला आहे. यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या सिलेब्रिटीचा चेहरा पाहिला तर हे सांगण्याची गरज नाही. तुम्हीच सांगा नियम तोडणारे हे महाशय कोण आहेत ? असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

हेही पहा –