मुंबईची चीनसोबत तुलना; आव्हाडांकडून बीएमसीची पाठराखण

मुंबई : सध्या शहरात पावसाने थैमान घातले आहे. सर्वत्र पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून सतत मुंबईत पाऊस हजेरी लावत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे मुंबईच्या अनेक रस्त्यावर पाणी साठलेले आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तसेच अनेक विरोधी पक्ष राज्य सरकारला या कारणामुळे धारेवर धरत आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईची तुलना चीनच्या झेन्ग्झुवा या जगातल्या सगळ्यात जास्त आयफोन उत्पादन शहरासोबत केला आहे. त्यांनी झेन्ग्झुवा शहरातील पावसामुळे पाण्याने भरलेल्या रस्त्याचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असे म्हंटले की, ‘हे चित्र मुंबईतले नाही तर चायनातले आहे हे iphone चे सर्वात जास्त उत्पादन करणारे शहर आहे’ असे ते म्हणाले. दरम्यान, या पूर्वी कॉंग्रेसने असे वक्तव्य केले होते की मुंबईचे आम्ही शांघाई करू असे म्हंटले होते. मात्र आता राष्ट्रवादीने थेट मुंबईची तुलना चीनशी आताच केली आहे. पण या तुलनेचे कारण मुंबईकरांना पटेल का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तसेच सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी देखील मुंबई महानगरपालिकेची पाठराखण केली होती, त्यात ते म्हणले, ‘मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत असलेली मोठी लोकसंख्या यामुळे निवासाचा प्रश्न पूर्वांपार बिकट आहे. त्यातून मुंबई आणि उपनगरांमधील छोटे-मोठे डोंगरही सुटलेले नाहीत. निसरड्या डोंगरउतारांवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांत हजारो कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दर पावसाळ्यात त्या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो.’ असे ते म्हणले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP