देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत- हसन मुश्रीफ 

hasan mushrif

कोल्हापूर- शेती व्यवसायाबरोबर शेतकरी जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करत असतो. कोरोना संसर्ग आजाराच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच दूध दरही कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी १ ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभर दूध दरवाढीसाठी दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यात सहकाराच्या माध्यमातून २४ टक्के दूध संकलन केले जाते. तर खासगीच्या माध्यमातून ७६ टक्के दूध संकलन होते. या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी झाली, पण सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी केली नाही. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखे करत आहेत अशी टीका विरोधक करत आहेत.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजापवर आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते  म्हणाले, ‘भाजप नेत्यांनी दूध दर आंदोलनासाठी एक ऑगस्ट रोजी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. कारण यादिवशी बकरी ईद आहे, शिवाय सरकारी सुट्टी आहे. यादिवशी त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष कोण देणार, असा सवाल मुश्रीफ यांनी  केला आहे.

दूध दरासाठी आंदोलन योग्य आहे. दूधाला दर मिळालाच पाहिजे’अशी पुस्तीही जोडली. फडणवीस यांचे मुहूर्त नेहमीच चुकीचे ठरतात, असे सांगताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपची कार्यकारिणी बैठक घेऊन त्यांच्यावर टीका केली. वाढदिवसादिवशी तरी चांगल्या माणसाचे कौतुक करायचे असते. पण त्या दिवशी देखील फडणवीस यांचा मुहूर्त चुकलाच. वाढदिवसाला टीका करून त्यांनी अपशकुन केला असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

…तोपर्यंत मी कोरोनाची लस घेणार नाही, राजीव बजाज याचं मोठ विधान

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय लांबणीवर; १० ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्या, सुनील केदारांचे आदेश