…तरी आमचे सरकार खचणार नाही, 5 वर्षे काम करतच राहील – गुलाबराव पाटील

gulabaro_patil

टीम महाराष्ट्र देशा : ‘कोणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. या गोष्टीचे कुणीही समर्थन करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार खचावे, म्हणून भाजपकडून निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत. फोन टॅपिंग हा त्यातलाच एक भाग आहे,’ अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली.

ते जळगाव येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या काळातही फोन टॅपिंगचे असे प्रकार घडले आहेत. ही एक प्रकारची रणनीती असते. मात्र, कुणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचेच आहे. हा प्रकार करण्यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आमचे सरकार खचणार नाही. 5 वर्षे काम करतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading...

तसेच भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी इस्रायलमधून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप खुद्द दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'