आदित्य ठाकरे शिवसेनेचे ‘जेष्ठ नेते’; सरकारचा पाठींबा काढण्याचा निर्णय ते घेवू शकतात- बापट

aaditya thackeray and girish bapat

नागपूर: सरकारचा पाठींबा काढण्याचा निर्णय जेष्ठ नेते घेत असतात. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते सरकारचा पाठींबा कधी काढायचा याचा निर्णय घेवू शकतात म्हणत संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. पुढील एका वर्षात शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याच वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते, याबदल बापट यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना बापट म्हणाले कि, ‘फडणवीस सरकारने यशस्वी तीन वर्षे पूर्ण केली आहेत. पुढील दोन वर्षाचा कार्यकालही आम्ही पूर्ण करू, तसेच शिवसेनेन राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा सरकारचा पाठींबा काढावा. मात्र त्यांनी पाठींबा काढला तरी सरकारला कोणताच धोका नसल्याचा विश्वास’ यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.