कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते – छगन भुजबळ

chagan bhujbal

नाशिक : कोरोनाची लाट त्सुनामीसारखी पुन्हा येऊ शकते, त्यामुळे शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत उद्या रविवारी बैठक होणार आहे. नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा, याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा की पुढे ढकलावा, याबाबत रविवारी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. जगातील अनेक देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यात महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. संमतीपत्र द्यायला पालक तयार नाही. अस भुजबळ म्हणाले आहेत

कोरोनाची लागण होणार नाही, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे नाशिकमधील शाळांच्या बाबतीत उद्या बैठक घेऊन चर्चा करु. त्यानंतर निर्णय घेणार आहोत. अस भुजबळ म्हणाले आहेत. तर राज्यात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत देखील मंत्रिमंडळात मतमतांतरे नक्कीच आहेत. आपल्या डोक्यावरची कोरोनाची टांगती तलवार आपल्या मानेवर पडता कामा नये, अशी भीती भुजबळांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, स्थानिक प्रशासनानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशा सुचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या