लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस पूर्वसूचना द्या – छगन भुजबळ

chhagn bhujbal

नाशिक : लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस नागरिकांना पूर्वसूचना द्यायला हवी असा माझा आग्रह आहे. नागरिकांचे हाल होऊ नयेत तसेच गोंधळ उडू नये यासाठी आधी माहिती द्यायला हवी . अद्याप लॉकडाऊन करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा होईल असं सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लॉकडाऊन पूर्वीची सर्व खबरदारी घेण्यात येईल असे संकेत दिले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधला. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक मान्यवरांशी चर्चा करत राज्यातील लॉकडाऊन लावायचा की निर्बंध कडक करायचे यावर चर्चा केली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

महत्वाच्या बातम्या