fbpx

विधानसभेत अजित पवारांना पराभूत करू म्हणालो तरी तुम्ही हसाल – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं आज मी म्हणालो तर तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेच्या पूर्वसंध्येला बारामतीच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बारामतीच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात काय व्युहरचना आखली? असा प्रश्न त्यांना केला. दरम्यान २०१९ विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं माझं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो. माझं लक्ष बारामती विधानसभा नसून २०२४ बारामती लोकसभा आहे, असे पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे, त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं म्हणलो तरी तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असा टोलाही पाटील यांनी लगावला. तसेच अजित पवार हे ज्याप्रकारचे नेते आहेत, बारामतीतील त्यांचं स्थान खूप आहे, मात्र आम्ही बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू, असंही त्यांनी म्हंटले.