मराठी माणसाला लिव्ह-इन रिलेशन काय असतं हे माहितीच नाही, थोरातांचा फडणवीसांना टोला

fadanvis balasaheb thorat

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेदाबद्दल आणि सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे, हेच कळत नाही. हे सरकार लिव्ह इन-रिलेशनशिप मध्ये आहे, कुटुंब नाही, त्यामुळे सरकार टिकेल असं वाटत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे व्हिजन याबद्दल आपलं मत मांडलं होत.

“हे लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही स्वतःहून पडेल” या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस वक्तव्याचा राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

‘हे कशावर आणि कशाच्या आधारे भविष्यवाणी करतात हेच मला समजलेलं नाही’, थोरातांचा जोरदार टोला

भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि याबाबतीत आत्मचिंतन करावं” असा सल्ला थोरातांनी दिला.

तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “महाविकास आघाडी सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार” असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. “सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणी हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही” असा टोला थोरातांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

‘सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार’, आदर पूनावालांचा मोठा दावा

IMP