कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूत करणाऱ्या महामूर्खाला शोधलं पाहिजे – बच्चू कडू

bachhu kadu 1

अमरावती : शेतमालाला लाभदायक किंमत मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यानुसार कडधान्ये, खाद्यतेले, तेलबिया, डाळी, कांदा आणि बटाटा ही पिके निर्बंधमुक्त करण्यात येणार आहेत.

दरम्यान,जर असे झाले तर शेतकरी या पिकांची निर्यातही करू शकणार आहे. त्यामुळे त्याच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी असून त्याचे उत्पन्न वाढण्याची आशा आहे. कृषी उत्पादनांची गुणवत्ता आणि पॅकेजिंग सुधारण्यावर भर देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे .

#corona update : ‘हा’ आहे जगातील पहिला देश ज्याने कोरोनाच्या संकटावर केली मात

मंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

कांदा जीवनावश्यक वस्तूंमधून काढणार, असे सरकारचे धोरण येणार असल्याचे समजलं. प्रथमच मी सरकारचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो, पण कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामुर्ख कोण आहे, त्याला शोधलं पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.’कांदा खाल्ल्या नाही तर लोक मरतात असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम राहील. ही हरामी खरं तर संपली पाहिजे. कांदा निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे. त्यामुळे कांदा तून काढून त्याला सबसिडी दिली पाहिजे.

कृषीउत्पन्नाची हमी देणारा कायदा

पेरणी करताना शेतीमालाला दर काय असेल आणि किती माल विकला जाईल याची शेतकऱ्याला खात्री नसते. ही जोखीम कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी देणारी कायदेशीर यंत्रणा तयार करणार. यात उत्पादनाच्या गुणवत्तेचे देखील मानकीकरण केले जाईल. शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून न राहता थेट निर्यातक, घाऊक व्यापारी, प्रक्रिया उद्योगांना माल शेतातूनच विक्री करता येईल.

#corona : कोरोनाच्या युद्धात आणखी 2 पोलीस शहीद, तर 79 पोलिसांना कोरोनाची लागण